शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

मालवणमध्ये महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 8:46 AM

धुरीवाडा येथील साई समर्थ रेसिडेन्सीमध्ये राहणार्‍या संजना ऊर्फ सोनाली चंद्रशेखर पेंडुरकर (वय 19) या महाविद्यालयीन तरुणीनं सदनिकेतील आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

मालवण : धुरीवाडा येथील साई समर्थ रेसिडेन्सीमध्ये राहणार्‍या संजना ऊर्फ सोनाली चंद्रशेखर पेंडुरकर (वय 19) या महाविद्यालयीन तरुणीनं सदनिकेतील आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तिच्या मृत्यूने पेंडुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

संजना हिचे प्राथमिकचे शिक्षण येथील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये झाले. कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती सध्या रत्नागिरीतील फिनोलेक्समध्ये तृतीय वर्षात शिकत होती. पंधरा दिवसांपूर्वी ती परीक्षा देऊन धुरीवाडा येथील घरी आली होती. काल सकाळी तिची आई, दोन लहान बहिणींना घेऊन कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, तर वडील आपल्या सोन्याच्या पेढीवर गेले होते. घरात कोणी नसल्याने सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान तिने आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.दुपारी घरी परतलेल्या आईने मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून दरवाजा लॉक होता. त्यामुळे दुसर्‍या चावीने दरवाजा उघडला असता संजना ही गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. मुलीने आत्महत्या केल्याचे दिसताच पेंडुरकर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. तिचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. 

या घटनेची माहिती मिळताच शहरातील सुवर्णकारांनी पेंडुरकर यांच्या धुरीवाडा येथील निवासस्थानी धाव घेतली. उमेश नेरुरकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, यतीन खोत यांच्यासह अन्य सुवर्णकार तसेच लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन, नीलेश सोनावणे, संतोष गलोले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. संजना ही उत्कृष्ट गायिकासुद्धा होती. 

टॅग्स :Suicideआत्महत्याsindhudurgसिंधुदुर्ग