CM शिंदेंनी आई भराडीदेवीचे घेतले दर्शन; मंदिराच्या विकासासाठी निधी देण्याचं दिलं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 12:46 PM2024-03-02T12:46:52+5:302024-03-02T12:47:51+5:30

शक्य तिथे असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. 

CM Eknath Shinde visited Aai Bharadi devi; He promised to provide funds for the development of the temple | CM शिंदेंनी आई भराडीदेवीचे घेतले दर्शन; मंदिराच्या विकासासाठी निधी देण्याचं दिलं आश्वासन

CM शिंदेंनी आई भराडीदेवीचे घेतले दर्शन; मंदिराच्या विकासासाठी निधी देण्याचं दिलं आश्वासन

कोकणवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतले आहे. यावेळी बोलताना, कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो. आज माझे सौभाग्य की मला आई भरडीदेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर 'कोकण विकास प्राधिकरण' स्थापन केले असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील. तसेच कोकणातील नद्यातून वाहून जाणारे पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे, शक्य तिथे असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. 

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई-सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आंगणेवाडीतील या आई भराडीदेवीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात. त्यांच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल, त्यासाठी मंदिर समितीने आपल्या सूचना द्याव्यात आणि त्यानुसार मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर तयार करण्यात येईल असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते.

Web Title: CM Eknath Shinde visited Aai Bharadi devi; He promised to provide funds for the development of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.