सिंधुदुर्ग : ऑनलाइन औषध विक्री बंद करा, तहसिलदाराना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:02 IST2019-01-09T12:59:45+5:302019-01-09T13:02:21+5:30
ऑनलाइन औषध विक्री विरोधात औषध विक्रेता संघटनेच्यावतीने भारतभर मंगळवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत कणकवली तालुका केमिस्ट अड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने तहसीलदार संजय पावसकर याना निवेदन देण्यात आले. तसेच शासनाच्या धोरणाबाबत यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

कणकवली तहसीलदार संजय पावसकर यांना तालुका केमिस्ट असोसिएशनच्यावतीने निवेदन देण्यात आले .यावेळी दयानंद उबाळे , अजित नष्टे, संजय घाडिगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली :ऑनलाइन औषध विक्री विरोधात औषध विक्रेता संघटनेच्यावतीने भारतभर मंगळवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत कणकवली तालुका केमिस्ट अड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने तहसीलदार संजय पावसकर याना निवेदन देण्यात आले. तसेच शासनाच्या धोरणाबाबत यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
कणकवली तहसील कार्यालयात तहसिलदारांची भेट घेऊन त्याना निवेदन देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद उबाळे , तालुकाध्यक्ष संजय घाडीगावकर , तालुका सचिव अजित नष्टे, विजय घाडी, बाळासाहेब डोर्ले, विवेक आपटे, मकरंद घळसासी ,नंदू सावंत, योगेश रेडेकर, अभिनंदन डोर्ले, सोनाल साळगावकर, विनिता बुचडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाइन औषध विक्री समाजाच्या हिताची नसून त्यामुळे होणारे दुरुपयोग टाळण्यासाठी संघटनेच्यावतीने हे निवेदन देण्यात येत आहे . ऑनलाइन औषधांसाठी केंद्र शासन अनुमानित प्रस्तावित मसुदा घेऊन येत आहे . त्याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने कित्येक आंदोलने केली आहेत. ज्यामध्ये तीन वेळा भारत बंद मूक मोर्चा, ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही शासन त्याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही .
चेन्नई तसेच दिल्ली उच्च न्यायालय यांनी ऑनलाइन औषधांची विक्री बंद करावी असा आदेश दिला होता .मात्र , शासनाने त्याचा गांभीर्याने विचार केलेला नाही. प्रस्तावित अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये संघटनेचे मत जाणून घेण्यात यावे , ज्यामुळे समाज हिताकडे दुर्लक्ष होणार नाही. अशी आमची मागणी आहे.
व्यवसायापेक्षा समाजहित जास्त महत्त्वाचे असून आम्हीही समाजाचे घटकच आहोत. ऑनलाइन औषधामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र त्याबाबत काहीच न झाल्याने देशभर मंगळवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.