शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग किल्ला घेणार मोकळा श्वास, केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून स्वच्छता अभियान सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 12:06 IST

छत्रपतींच्या हाता-पायांचे ठसे आणि एकमेव मंदिर

संदीप बोडवेमालवण : केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विजयदुर्ग उपमंडळाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्यावर २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष स्वच्छता अभियान ३.० राबविण्यात येत आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक दुर्गमित्रांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.स्वच्छता अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरील झाडी - झुडपे साफ करण्यात आली आहेत. आता अंतर्गत साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने लवकरच सिंधुदुर्ग किल्ला मोकळा श्वास घेणार असल्याने दुर्गप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग किल्ला कात टाकणार..

हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख ठाणे असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः जातीनिशी लक्ष देऊन बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. लवकरच मालवण येथे होणाऱ्या नौसेना दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यांचे आरमारी महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने लक्ष घातले आहे. यामुळे भविष्यात सिंधुदुर्ग किल्ला कात टाकणार आहे.

पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्षस्वच्छता अभियानामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. त्यामुळे स्वच्छताचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्व विद डॉ. शुभ मजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले सफाईचे काम सुरू आहे.

तटबंदी झाली मोकळी

पावसाळ्यात किल्ल्याच्या तटबंदीवर मोठ्या प्रमाणात झाडीझुडपी वाढली होती. तटबंदीवरील झाडी तोडून साफ करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षण भिंतीवरील जंगली झाडे व गवत काढण्यासोबत किल्ल्याचा परिसर स्वच्छ करण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे.छत्रपतींच्या हाता-पायांचे ठसे आणि एकमेव मंदिरसिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता-पायांचे ठसे संग्रहित करण्यात आले आहेत. भारतातील एकमेव असे खुद्द राजाराम महाराजांनी बांधलेले छत्रपतींचे मंदिर याच किल्ल्यात आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी ३ किलोमीटर आणि २७ बुरुज आहेत. किल्ल्याचे क्षेत्रफळ ४८ एकर आहे. किल्ल्यावर ३ तलाव, ३ विहिरी आणि ६ मंदिरे आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड