शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ला नगरपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव, कारभारावर नागरिकांचा निषेध; मुख्याधिकाऱ्यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:37 IST

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील दोन चार राजकारणी आणि निवडक कंत्राटदार लॉबीतील लोकांच्या हाताखाली त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार हाकत असल्याचे ...

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील दोन चार राजकारणी आणि निवडक कंत्राटदार लॉबीतील लोकांच्या हाताखाली त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार हाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून, त्याचा आम्ही निषेध करतो. नगरपरिषदेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावे, अशी मागणी वेंगुर्ल्यातील सजग नागरिकांनी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्याकडे केली आहे. ॲड. नंदन वेंगुर्लेकर, ॲड. मनीष सातार्डेकर, डॉ. वंदन वेंगुर्लेकर व अवधूत वेंगुर्लेकर यांनी मुख्याधिकारी किरूळकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले की, गेली अडीच ते तीन वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकांच्या नेतृत्वाखाली हाकला जात आहे.लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी व वेंगुर्ल्यातील मोजक्या राजकारण्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे पालिकेचा कारभार हाताळला आहे. शहरातील सर्व प्रकारचे कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांना कधीच आदराने पाचारण केले जात नाही, ही बाबही अतिशय खेदजनक आहे. या प्रकारचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

कोकण आयुक्तांकडे रितसर तक्रार करणारकेवळ चार-पाच व्यक्ती म्हणजे संपूर्ण शहर असूच शकत नाही. याची साधी जाणीव पालिकेला नाही. विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत यापूर्वीच्या आढावा बैठकीत फक्त राजकीय पक्ष प्रतिनिधी व निवडक कंत्राटदार लॉबी यांना बोलावून सामान्य नागरिकांची गळचेपी केली आहे, असे शहरवासीयांच्या दृष्टिक्षेपात आलेले आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त, कोकण भवन बेलापूर यांच्याकडे आपली रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी मुख्याधिकारी यांना दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग