शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

पूरमुक्तीसाठी चिपळूणकरांचा लढा; बचाव समितीचे साखळी उपोषण सुरु, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 2:38 PM

चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले होते. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी बचाव समितीने आपल्या विविध मागण्यासाठी आज, सोमवारपासून साखळी उपोषण सुरु केले आहे.

चिपळूण : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी चिपळूण बचाव समितीने आज, सोमवारपासून सुरु केलेल्या साखळी उपोषणाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या साखळी उपोषणानिमित्त येथील बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही शेकडोंच्या संख्येने सहभाग घेतला आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पुन्हा एकदा समितीने दिला आहे. या आंदोलनकर्त्यांची आमदार शेखर निकम यांनी भेट घेतली आहे. समितीच्या मागण्यांविषयी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार निकम यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले. नगर परिषद समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात केली. येथील प्रांत कार्यालयासमोर हे साखळी उपोषण सुरु आहे.चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी नदीचा गाळ काढणे हा त्यावरील मुख्य पर्याय आहे. यासाठी चिपळूण बचाव समितीने विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत. यामध्ये वाशिष्ठी व तिच्या उपनद्या उगमस्थानापासून मुखापर्यंत गाळ काढणे करीता आवश्यक अध्यादेश काढून आर्थिक नियोजन करणे, चिपळूण व परिसराला उध्वस्त करणारी लाल आणि निळी रेषा रद्द करा, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात करा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील नदी नाले, पन्हे यांचा गाळ काढणे, आवश्यक तेथे पूर नियंत्रक बंधारे बांधणे, वाशिष्ठी वळण बंधारा गाळमुक्त करणे, अतिवृष्टी असताना भरती काळात विद्युत निर्मिती बंद करणे, प्रत्यक्ष कार्यस्थळी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करणे, नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती धरण क्षेत्रात व्हावी, जास्त विद्युत निर्मितीचे पाणी दुसरीकडे वाळवावे, नियमानुरुप आपत्ती व्यवस्थापन करणे, आपत्ती काळात धोक्याची सूचना देणारी यंत्रणा प्रत्येक ठिकाणी बसवणे, पाण्याची गती व गेज मोजणारी स्वयंचलित आधुनिक यंत्रे बसवणे, ठिक ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविणे आदी मागण्या केल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfloodपूरChiplunचिपळुण