शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

चिपी विमानतळाची कामे युद्धपातळीवर हाती घ्या : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 16:46 IST

चिपी विमानतळाला आवश्यक सर्व पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर हाती घ्या येत्या 1 मे पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने करा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

ठळक मुद्देचिपी विमानतळाची पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर हाती घ्या : मुख्यमंत्रीउपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चिपी विमानतळ येथे विशेष बैठक

सिंधुदुर्गनगरी : चिपी विमानतळाला आवश्यक सर्व पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर हाती घ्या येत्या 1 मे पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने करा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.चिपी विमानतळासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चिपी विमानतळ येथे आज आयोजित केलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव अजोय मेहता, पालक सचिव वल्सा नायर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अशिषकुमार सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अश्विनी कुमार, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, आय.आर.बीचे राजेश लोणकर, किरण कुमार, सुधिर होशिंग आदी उपस्थित होते.चिपी विमानतळावरून हवाई वाहतूक प्राधान्यांने सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन आपापली कामे प्राधान्याने करावी अशी सुचना करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विमानतळावर राज्य शासनाच्यावतीने करावयाच्या सर्व उपाययोजना प्राधान्याने हाती घ्या.

यामध्ये नियमीत विद्युत पुरवठा, एमआयडीसी कडील जमीनीचे हस्तांतरण, स्ट्रीट लाईटचे काम, सात मीटरचा रस्ता, पाणी पुरवठा या सर्व कामांचा कृती आराखडा तयार करून ही कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. याबरोबरच आयआरबीने टर्मिनलचे काम 15 एप्रिलपर्यंत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.प्रारंभी पालक सचिव वल्सा नायर यांनी चिपी विमानतळावर सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती सांगितली. तसेच कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिपी विमानतळाची पाहणी केली. या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्ग