शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिपी विमानतळाचे उदघाटन ५ मार्च रोजी, मुख्यमंत्री उपस्थित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:26 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देचिपी विमानतळाचे उदघाटन ५ मार्च रोजीआचारसंहितेपूर्वी उद्घाटन, मुख्यमंत्री उपस्थित राहणार

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात बुथ बनवण्याचे काम सुरू आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, महेश धुरी, बाळू शिरसाट, दत्ता कोळमेकर आदी उपस्थित होते.यावेळी तेली म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाकडे नेणारे चिपी विमानतळ आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

५ मार्चला हा कार्यक्रम ठरला आहे. यावेळी केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह भाजपाचे व शिवसेनेचे पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खासगी विमान उतरविण्यात आले होते. मात्र आता अधिकृतरित्या शासकीय उद्घाटन होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केले.चिपी विमानतळ जिल्ह्यातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, विकासाला चालना देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा फायदा निश्चितच येथील लोकांना होणार आहे. भाजपच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी बुथ निहाय कमिट्या घोषित करण्याचे काम सुरू आहे.

या बुथ प्रमुखांना पदे जाहीर करण्यात आली आहेत. गावागावात वस्तीवाड्यांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे तेली म्हणाले.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्ग