शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

मुख्यमंत्र्यांची दलाली दोन दिवसांत उघड करणार

By admin | Published: February 15, 2016 1:14 AM

नारायण राणे : मुख्यमंत्र्याशी ‘पालघर’च्या प्रचारातील भाषा असंस्कृत

लांजा : मुख्यमंत्र्यांनी पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात माझा ‘दलाल’ असा उल्लेख केला होता. ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारी नाही. परंतु, येत्या दोन दिवसांत मी मुंबईत जाऊन यांची दलाली दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावेळी नागपूरच्या काही लोकांनी येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! देवेंद्रजी, याला दलाली म्हणतात. मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेऊन मी ही सर्व दलाली दाखवून देईन, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.लांजा येथे सुमित्रा देसाई नागरी महिला पतसंस्था व कोकण किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी या दोन संस्थांच्या उद्घाटन समारंभासाठी लांजा येथे आले असता राणे बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषा वापरावी, ही त्यांना संस्कृतीच राहिली नाही. काही दिवसांपूर्वी मी पालघर येथील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला गेलो होतो. त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले असता त्यांनी माझ्यावर टीका केली. ते म्हणाले होते की, इथे प्रचाराला कोकणचे नेते आले होते. हे नेते नाहीत, दलाल आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडात अशी भाषा शोभते का? पण मीसुद्धा ‘यांची’ दलाली दाखवून देईन. दोन दिवसांतच मुंबईला जाऊन त्यांनी काय काय दलाली दिली, हे दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा नागपूरच्या काही लोकांनी मुंबईत येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व उघड करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा कांगावा करत आहेत. परंतु, एका वर्षात राज्य सक्षम होत नाही. काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कामाचे हे मुख्यमंत्री आता सादरीकरण करत आहेत व स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे सर्व श्रेय काँग्रेसचे आहे, असे राणे म्हणाले.यावेळी नीलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आमच्या ‘स्टाईल’ची कॉपी करू शकतात. परंतु, विकास करू शकत नाहीत. जैतापूर आयलॉग प्रकल्पाला विरोध, आता चौपदरीकरणालाही त्यांचा विरोध! यांचा सर्वच गोष्टीला विरोध. मग कोकणचा विकास कसा साधणार? शौचालय व पाणी वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकांना मिळालेले अनुदान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू आणि निकृष्ट दर्जाची शौचालये तोडून टाकू, असा इशारा माजी खासदार राणे यांनी दिला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता डोळस, अशी भाषा शोभते का? पण मीसुद्धा ‘यांची’ दलाली दाखवून देईन. दोन दिवसांतच मुंबईला जाऊन त्यांनी काय काय दलाली दिली, हे दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा नागपूरच्या काही लोकांनी मुंबईत येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व उघड करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा कांगावा करत आहेत. परंतु, एका वर्षात राज्य सक्षम होत नाही. काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कामाचे हे मुख्यमंत्री आता सादरीकरण करत आहेत व स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे सर्व श्रेय काँग्रेसचे आहे, असे राणे म्हणाले.यावेळी नीलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आमच्या ‘स्टाईल’ची कॉपी करू शकतात. परंतु, विकास करू शकत नाहीत. जैतापूर आयलॉग प्रकल्पाला विरोध, आता चौपदरीकरणालाही त्यांचा विरोध! यांचा सर्वच गोष्टीला विरोध. मग कोकणचा विकास कसा साधणार? शौचालय व पाणी वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकांना मिळालेले अनुदान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू आणि निकृष्ट दर्जाची शौचालये तोडून टाकू, असा इशारा माजी खासदार राणे यांनी दिला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता डोळस, माजी खासदार नीलेश राणे, नीलम राणे, नगराध्यक्षा संपदा वाघधरे, राजापूर नगराध्यक्षा मीना मालपेकर, दत्ताराम चाळके, सुहास बने, सुरेश साळुंखे, विजय भोसले, किरण नाईक, रिलायन्स एजन्सी मुंबईचे भारतभूषण शर्मा, संजीव भान, किशोर मोरे, महेंद्र चव्हाण, शांताराम गाडे, सुमित्रा देसाई, महिला नागरी पतसंस्था संस्थापक राजन देसाई, कोकण किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष ऋषिनाथ पत्याणे, पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा राणे, रवींद्र नागरेकर, अनामिका जाधव, संभाजी काजरेकर, सुरेश बाईत, प्रसन्न शेट्ये, प्रकाश लांजेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)