शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उशिराने रुग्ण दाखल होत असल्याने दगावतो : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 15:46 IST

CoronaVirus In Sindhurug : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या मोठी दिसत असली तरीही रुग्ण पॉझिटिव्हिटी दर खाली आलेला आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, त्याचं कारण म्हणजे रुग्ण उशिराने दाखल होतात हे आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देउशिराने रुग्ण दाखल होत असल्याने दगावतो : के. मंजुलक्ष्मीरुग्णवाढीचा दर मंदावला : गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या मोठी दिसत असली तरीही रुग्ण पॉझिटिव्हिटी दर खाली आलेला आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, त्याचं कारण म्हणजे रुग्ण उशिराने दाखल होतात हे आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, रुग्णसंख्या अधिक दिसत असली तरी तपासणी वाढवल्यामुळे ही संख्या अधिक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटस्पॉट निश्चित केले असून त्या ठिकाणच्या तपासण्या अधिक प्रमाणात वाढविण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची साथ इतर जिल्ह्यांपेक्षा उशिराने सुरू झाली आणि ती मोठ्या प्रमाणात वाढली. आता ही साथ हळूहळू आटोक्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरूराज्याचा मृत्यूचा दर हा दोन टक्के आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यू रेट २.४ टक्के एवढा आहे. हा खरे म्हणजे जास्तच आहे. याचे कारण म्हणजे रुग्ण उशिराने दाखल होतात. रुग्ण गंभीर झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल होतो आणि त्याचा परिणाम मृत्यूमध्ये होतो, तसेच ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मात्र, हे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयातील चार तज्ज्ञ फिजिशियन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अजून चांगले उपचार करणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग