शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ उद्यानातील वस्तू बदला

By admin | Updated: August 17, 2014 22:32 IST

नारायण राणे यांचे आदेश : सिंधुदुर्गनगरीतील टाऊन पार्कचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाची सुविधा देणाऱ्या टाऊन पार्क आणि दाबाचीवाडी येथील उद्यान या दोन प्रकल्पांचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र दाबाचीवाडी येथील उद्यानाच्या कामाबाबत राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत उद्यानातील वस्तू बदलण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, टाऊन पार्क १ कोटी ८६ लाख व सिंधुदुर्गनगरी बोटींग जेटी व उद्यानावरील विकासासाठी ४ कोटी ७२ लाख मिळून ६ कोटी ५८ लाखांचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. सिंधुदुर्गनगरीतील टाऊन पार्क आणि दाबाचीवाडी तलावातील बोटींग, जेटी आणि उद्यान प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, काँग्रेसचे युवा नेते नीतेश राणे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर तावडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय अधिकारी रवींद्र बोबले, पत्तनचे कार्यकारी अभियंता श्रीकांत डेघडे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता छाया नाईक, दाबाचीवाडी सरपंच मळवे, उपसरपंच तेजल पाटकर, पंचायत समिती सदस्य परशुराम परब, अवधूत मालवणकर, उदय जांभवडेकर, भाई सावंत, राजन परब, पोलीस पाटील सुनील पाटकर आदी उपस्थित होते.या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सर्व कामांची फिरून पाहणी केली. सुरूवातीला उद्यानाची पाहणी करताना राणे म्हणाले, मुलांसाठी उभारण्यात आलेले झोपाळे, घसरगुंडी, बसण्यासाठी बाक, शोची झाडे या वस्तू टिकावू नसून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. एक ना अनेक त्रुटी काढत गार्डन आहे की जंगल? असा सवालही यावेळी कार्यकारी अभियंता श्रीकांत डेघडे यांना उपस्थित केला. त्रुटी सांगितलेल्या वस्तू तत्काळ बदला, असे आदेश राणे यांनीदिले. (प्रतिनिधी)