कुडाळ तालुक्यात काजू बागेला आग, लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:06 IST2020-05-23T13:05:29+5:302020-05-23T13:06:47+5:30
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे खुटवळवाडी येथील शेतकरी राजेंद्र मंगेश उर्फ गुरू मुंज यांच्या सहा एकर काजू बागेला अचानक ...

घावनळे खुटवळवाडी येथील शेतकरी राजेंद्र मंगेश उर्फ गुरू मुंज यांच्या सहा एकर काजूबागेला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
ठळक मुद्देकुडाळ तालुक्यात काजू बागेला आग लाखो रुपयांचे नुकसान
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे खुटवळवाडी येथील शेतकरी राजेंद्र मंगेश उर्फ गुरू मुंज यांच्या सहा एकर काजू बागेला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
बागायतदार मुंज यांनी दहा एकरमध्ये सहाशे कलमांची काजूची बाग उभारली होती. या आगीच्या घटनेत त्यातील तीनशे कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बुधवारी ही घटना घडली. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला. २ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.