आंबोलीत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचाऱ्यास धडक; तर धबधब्याजवळ बसला ठोकले
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 9, 2022 18:31 IST2022-09-09T18:29:28+5:302022-09-09T18:31:19+5:30
या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास आंबोली पोलीस उपनिरीक्षक अमित गोते,पोलीस नाईक दीपक शिंदे,कॉन्स्टेबल अभिजित कांबळे करीत आहेत.

आंबोलीत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचाऱ्यास धडक; तर धबधब्याजवळ बसला ठोकले
महेश सरनाईक
आंबोली (सिंधुदुर्ग) : येथील कामतवाडी येथील नागरिक रस्त्याच्या कडेने जात असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका इनोवा कार ने ठोकरून पसार झाला. मात्र घाटात धबधब्याजवळ देखील त्याने एका पर्यटनासाठी आलेल्या गोवा ते चेन्नई अशी नवीन शो रूम मधून जाणारी बसला ठोकरले. तोपर्यंत आंबोली पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मात्र काही वेळात त्या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती कळताच त्या गाडीच्या चालक आणि गाडी ताब्यात घेतली. त्यात अहमदनगर हून ६ जण त्या गाडीतून गोव्याच्या दिशेने जात होते. त्या गाडीचा चालक विक्रम शिवदास दहिफळे , वय ३६, रा. मोहठादेवी, ता.पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांच्या विरोधात बेदरकारपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत होऊन इजा करणे आणि पळून जाणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांची मेडिकल करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान अपघात ग्रस्त विठ्ठल गावडे हे कामतवाडीतून नातू सोबत बाजारात येत असताना ईनोवा गाडीची धडक बसली.त्यात त्यांच्या पायाला,डोक्याला आणि कंबरेला मार बसला.त्यानंतर १०८ रुग्ण वाहिकेने आंबोली आरोग्य केंद्रात उपचार करून मग सावंतवाडी येथे हलविण्यात आले.
दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास आंबोली पोलीस उपनिरीक्षक अमित गोते,पोलीस नाईक दीपक शिंदे,कॉन्स्टेबल अभिजित कांबळे करीत आहेत.