शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

तिलारीतील कार जळीत प्रकरण: दोडामार्ग नगराध्यक्षांसह चार जणांना पाच दिवसांची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:54 IST

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून बंदोबस्त कायम

दोडामार्ग : गोमांस वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून तिलारी येथे स्विफ्ट कार पेटवून दिल्याच्या प्रकरणात सुमारे ५० ते ६० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गैरकायदेशीर जमाव करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच लोकसेवकाला त्याचे कायदेशीर काम करण्यापासून परावृत्त केल्याची फिर्याद पोलिस परशुराम गंगाराम सावंत यांनी दिली. त्यानुसार संशयित आरोपी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, महिंद्र खरवत, विजय कांबळे या चार जणांना अटक करून शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.पोलिस परशुराम गंगाराम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी निजामुद्दीन मोहम्मद कुरेशी हा त्याचे ताब्यातील मोटर कार क्रमांक जीए ०६ एफ ४५०७ या वाहनामध्ये मांसाची वाहतूक करीत असल्याचे वीजगरचे पोस्ट येथे समक्ष मिळून आला. त्याची माहिती आपल्या वरिष्ठांना देण्यात आली. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित चालकाची खातरजमा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरिता दोडामार्ग पोलिस ठाणे येथे घेऊन जात होतो. दरम्यान आम्ही १२:३० वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग बेळगाव रोडवर पाताळेश्वर मंदिराजवळ आलो असता सुमारे ५० ते ६० लोकांनी चारचाकी व दुचाकी वाहनाने आमचा रस्ता अडविला व जबरदस्तीने आम्हाला थांबून गाडीच्या सगळ्या काचा दगडाने व लाकडी दांड्याने फोडल्या. तसेच आरोपींनी गाडीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.निजामुद्दीन मोहम्मद सय्यद कुरेशी याची ताब्यातील मोटर कार क्रमांक जीए ०६ एफ ४५०७ या वाहनातून गोमांस घेऊन जात असल्याची अफवा पसरून घटना घडवून आणली. तसेच, फिर्यादी शासकीय गणवेशात असताना आणि फिर्यादी शासकीय कर्तव्य बजावत आहेत, हे माहीत असूनदेखील संबंधित संशयित आरोपींनी असले कृत्य केल्याची फिर्यादी यांनी कायदेशीर तक्रार दिलेली आहे.

दोडामार्ग नगराध्यक्षांसह चार जणांची तीन तास चौकशीवरील प्रकरण घडल्यानंतर सायंकाळी दोडामार्ग तालुक्यात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. ठिकठिकाणी कडक पहारा देण्यात आला होता. सायंकाळी कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी तत्काळ दोडामार्ग पोलिस ठाण्यात दाखल होत वरील प्रकरणी तपासाची सूत्रे हाती घेतली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी म्हणून नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, महिंद्र खरवत, विजय कांबळे या चार जणांना अटक केले. तीन तास त्यांची कसून चौकशी सुरू होती. ताब्यातील चारही जणांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.दुसऱ्या दिवशी कडक बंदोबस्तया घटनेचे गांभीर्य पाहता, या प्रकरणावरून तालुक्यात अन्य ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलिस बळ मागविण्यात आले होते. तालुक्यात मुख्य बाजारपेठ तसेच अन्य मार्गावर, चौकाचौकात कडक बंदोबस्त तैनात केला होता. तहसीलदार आवारात पोलिसांची फौज खडा पहारा देत होती. दुसऱ्या दिवशीही बंदोबस्त कायम होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Tilari Car Burning: Dodamarg Mayor and Four Others in Custody

Web Summary : Four arrested, including Dodamarg Mayor, for allegedly setting a car ablaze suspected of transporting beef in Tilari. They're accused of rioting and obstructing officials. All are in police custody for investigation.