सिंधुदुर्ग : पाट येथे कार उलटून अपघात; वाहनाचे नुकसान, अपघातात दोघेजण किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:51 PM2018-05-05T13:51:26+5:302018-05-05T13:51:26+5:30

पाट-गवळदेव येथील वळणावर शेतकऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी उलटली. या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले. मोटारीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Car accident at Pat; Vehicle damage, two and minor injuries in the accident | सिंधुदुर्ग : पाट येथे कार उलटून अपघात; वाहनाचे नुकसान, अपघातात दोघेजण किरकोळ जखमी

सिंधुदुर्ग : पाट येथे कार उलटून अपघात; वाहनाचे नुकसान, अपघातात दोघेजण किरकोळ जखमी

Next
ठळक मुद्देपाट येथे कार उलटून अपघात; वाहनाचे नुकसानअपघातात दोघेजण किरकोळ जखमी

कुडाळ : पाट-गवळदेव येथील वळणावर शेतकऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी उलटली. या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले. मोटारीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पाट-गोसावीवाडी येथील प्रशांत गोसावी व त्यांचे भाऊ आपल्या चारचाकीने कुडाळहून पाटच्या दिशेने जात होते. या दरम्यान ते पाट-गवळदेव येथील वळणावर डोक्यावरून कवळाचे ओझे घेऊन येणारा शेतकरी अचानक मोटारीसमोर आला.

त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची चारचाकी रस्त्याच्या कडेला जात उलटली. सुदैवाने गोसावी व त्यांचा भाऊ बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकºयाला वाचविण्याच्या प्रयत्नात परूळे येथे कार उलटली.

Web Title: Car accident at Pat; Vehicle damage, two and minor injuries in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.