शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरातील हत्तींना पकडण्यासाठी मोहीम, सिंधुदुर्ग वनविभागाकडून प्रस्ताव तयार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 12:28 AM

दोन्ही जिल्हयात सध्या चौदा हत्तींचा वावर असून,या हत्तींना एकाच वेळी तिलारीच्या जंगलात कर्नाटक कोल्हापूर व सिंधुदुर्गच्या सिमेवर पकडण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग वनविभागाकडून प्रस्ताव तयारदोन्ही जिल्हयात मिळून चौदा हत्तींचा वावर कोल्हापूर हद्दीत मोहीम राबवण्याचा विचार

- अनंत जाधव  सावंतवाडी  - सिंधुदुर्ग जिल्हयात पुन्हा एकदा हत्ती पकड मोहीम राबवण्यात येणार असून, त्यासाठी सिंधुदुर्गवनविभागाने दोडामार्ग  केर हेवाळे मोर्ले येथे असलेल्या चार हत्तींचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावा बरोबरच कोल्हापूर जिल्हयात असलेल्या दहा हत्तींचा ही एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. दोन्ही जिल्हयात सध्या चौदा हत्तींचा वावर असून,या हत्तींना एकाच वेळी तिलारीच्या जंगलात कर्नाटक कोल्हापूर व सिंधुदुर्गच्या सिमेवर पकडण्यात येणार आहे. याबाबतच्या जागेची निश्चीती झाली असली तरी अद्याप राज्य व केंद्र सरकारची परवानगी मिळणे बाकी आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने नागपूरला पाठवण्यात येणार आहे.गेली अनेक वर्षे कर्नाटक मधून आलेला हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी एक हत्तीचा कळप दोडामार्ग मधून देवगडपर्यत गेला होता. त्यानंतर तो माणगाव खोºयात स्थीरावला होता. त्यावेळी तत्कालीन उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हत्ती पकड मोहीम राबवण्यात आली होती. ती मोहीम यशस्वी झाल्यानंतर काहि अंशी हत्तींचा वावर जिल्हयातील कमी झाला होता. पण मागील दोन वर्षापासून पुन्हा हत्तींचा वावर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोºयात मोर्ले,हेवाळे, केर भोकुर्ली भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तेथील ग्रामस्थांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. बागायतींची मोठ्या प्रमाणात  हानी सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच वैतागले आहेत.पंधरा दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्याला या हत्तींचा बंदोबस्त कसा करावा यांची माहीती घेण्यासाठी खुद्द पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली व माहीती घेतली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी हत्तींना पकडण्यात यावे अशी मागणी केली त्याला पालकमंत्री खासदार यांनीही संमती दिली असून, प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे हत्ती कर्नाटकमधून तिलारीच्या जंगलात उतरतात. त्याना कर्नाटकमधून येणे जाणे सोपे आहे. त्यामुळे या भागात हत्तींचा वावर सºहास आढळून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग प्रमाणेच कोल्हापूर जिल्हयातील चंदगडचे काहि जंगल हे तिलारीला लागून असल्याने तेथेही हत्तींचा मोठा कळप आहे. दोडामार्ग मध्ये चार तर चंदगड येथे दहा हत्ती असे मिळून चौदा हत्तींचा वावर या भागात आढळून येत आहे.दोडामार्ग तालुक्यात चार हत्तीं पैकी टस्कर हत्ती हा अधिक त्रासदायक बनला आहे. तो मोठ्या प्रमाणात बागायतींचे नुकसान करत आहे. तसेच नवीन शेतीची लागवड ही करण्यात आली आहे. त्यांचे ही नुकसान करत असल्याने या हत्तींचा बंदोबस्त तातडीने करा अशी मागणी ग्रामस्थ करत असल्याने या बाबतचा प्रस्ताव सिंधुदुर्ग वनविभागाने केला आहे. यात तिलारीच्या जंगलाच्या वर कोल्हापूर हद्दीत हत्ती पकड मोहीम राबवण्यात यावी असे या प्रस्तावात उल्लेख असून, आणखी दोन ते तीन महिन्यानंतर हत्ती कोल्हापूर जिल्हयातील चंदगड तालुक्यात स्थीरावू शकतात. त्यामुळे तेथेही मोहीम राबवणे शक्य होईल असे या प्रस्तावात म्हटले आहे. तसेच कोल्हापूर जिल्हयात असलेल्या दहा हत्तींनाही याच ठिकाणी एकत्र आणून ही मोहीम राबवण्यात यावी, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.कर्नाटकमधील हत्ती पकड मोहीम राबवणारे काहि तज्ञ सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वनविभागाच्या संपर्कात असून, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी प्रत्येक हत्ती पकड मोहीमेला ३० लाख रूपयांचा बाहेर खर्च अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग वनविभागाने तयार केलेला प्रस्ताव कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षकाकडे पाठवण्यात येणार असून, नंतर तो नागपूर व मुंबई येथे मंजूरीसाठी जाणार आहे. मात्र राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली तरी खरी मंजूरी ही केंद्र सरकारकडून घ्यावी लागणार असून, त्यासाठी खासदार राऊत यांनी पुढाकार घेणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयात पुन्हा एकदा हत्ती पकड मोहीम राबवण्यात येणार आहे. हे आता निश्चीत झाले आहे. लवकरच प्रस्ताव कोल्हापूरला पाठवणार : आय.ए.जलगावकरसिंधुदुर्ग वनविभागाने हत्ती पकड मोहीमेचा प्रस्ताव तयार केला असून,तो प्रस्ताव लवकरच कोल्हापूर मुख्य वनसंरक्षकाकडे पाठवण्यात येणार असून, कोल्हापूर व सिंधुदुर्गचा एकत्रित प्रस्ताव नागपूरला जाणार आहे. एकूण चौदा हत्तींचा वावर हा कोल्हापूर व सिंधुदुर्ग मध्ये असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक आय.ए.जलगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागforestजंगल