शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Crime: जेवण करायला घरी आला, अन् चोरी करुन पळाला; सावंतवाडीतून एकजण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:33 IST

सावंतवाडी : घरात घुसून मोबाइलसह डंबेल्स, सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सालईवाडा येथील एकाला ताब्यात घेतले आहे. सायंकाळी त्यांच्यावर ...

सावंतवाडी : घरात घुसून मोबाइलसह डंबेल्स, सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सालईवाडा येथील एकाला ताब्यात घेतले आहे. सायंकाळी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मुन्ना ऊर्फ साजिद इसाक शेख (४३) असे त्याचे नाव आहे.याबाबतची तक्रार अल्ताफ अब्दुल मुल्ला रा. सालईवाडा यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३ फेब्रुवारीला घडली. सकाळी उठल्यानंतर हा प्रकार मुल्ला यांच्या लक्षात आला, असे त्यांचे म्हणणे आहे.सालईवाडा परिसरात राहणाऱ्या मुल्ला यांच्या घरात मुन्ना हा ३ तारखेला जेवण करण्यासाठी आला होता. त्यानंतर तो निघून गेला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी घरात असलेला व्यायाम करण्याचा डंबेल्स मुल्ला यांना दिसला नाही. यावेळी रात्री कोण आले होते का? असा प्रश्न त्यांनी आपल्या घरातील व्यक्तींना केला. यावेळी मुन्ना आल्याचे घरातून सांगण्यात आले. त्यानंतर मुल्ला हे सालईवाडा येथील मुन्नाच्या घरी गेले.यावेळी त्यांची पत्नी घरात होती. त्यांनी घरात पाहिले असता, चोरीला गेलेला डंबेल्स त्यांना त्या ठिकाणी दिसला. यावेळी तो आपला असून तो घेऊन आला, असे सांगून मुल्ला आपला डंबेल्स परत घेऊन आले.त्यानंतर त्यांनी घरात अन्य वस्तूंची शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मोबाइल आणि सोनसाखळी त्यांना दिसून आली नाही. यावेळी त्यांने घराची पाहणी केली असता, खिडकीच्या काचा व गज तोडलेले दिसले. त्यामुळे ही चोरी मुन्ना यानेच केली, असा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.त्यानुसार मुन्ना याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार डुमिंग डिसोझा यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस