कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाच्या कामावर भरत जाधवची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:19 IST2022-04-08T13:18:50+5:302022-04-08T13:19:14+5:30

कुडाळ शहरवासियांची मागणी असलेल्या कै. मच्छिंद्र कांबळे नाट्यगृहाच्या बांधकामाची ६ कोटी ५० लाख रुपये खर्चाची निविदा मंजूर झाली आहे.

Ca. Bharat Jadhav's displeasure over the work of Machhindra Kambli Natyagriha | कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाच्या कामावर भरत जाधवची नाराजी

कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाच्या कामावर भरत जाधवची नाराजी

सिंधुदुर्ग : कोट्यवधी रुपये खर्चून कुडाळ येथे होत असलेल्या कै.मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहामधील महत्वाच्या त्रूटीबाबत अभिनेते भरत जाधव यांनी खंत व्यक्त केली. कुडाळ येथील नाट्यगृहाला भरत जाधवने शुक्रवारी भेट दिली, त्यावेळी नाट्य सभागृहाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने राज्य सरकारच्यावतीने कुडाळ येथे हे सभागृह बांधण्यात येत आहे. 

कुडाळ शहरवासियांची मागणी असलेल्या कै. मच्छिंद्र कांबळे नाट्यगृहाच्या बांधकामाची ६ कोटी ५० लाख रुपये खर्चाची निविदा मंजूर झाली आहे. त्यानंतर, या सभागृहाचे कामही सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, अभिनेता भरत जाधवने आज या सभागृहाच्या कामाची पाहणी केली, व काही सूचनाही केल्या आहेत. या सुचनांचे पालन झाल्यास नाट्यगृह चांगले होईल आणि याठिकाणी पहिला प्रयोग करण्यासाठी मी स्वत: येईन, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Ca. Bharat Jadhav's displeasure over the work of Machhindra Kambli Natyagriha