कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:34 IST2023-04-22T16:33:47+5:302023-04-22T16:34:43+5:30
कधी होणार मतदान अन् मतमोजणी...जाणून घ्या

कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक
कणकवली : राजीनामा, निधन, अनर्हता व इतर कारणांमुळे ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या जागांसाठी तसेच थेट सरपंचपदांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांचा समावेश आहे.
वायंगणी नामाप्र स्त्री, ओझरम नामाप्र स्त्री, पिसेकामते सर्वसाधारण स्त्री व नामाप्र स्त्री, साकेडी सर्वसाधारण स्त्री, हुंबरठ अनुसूचित जाती स्त्री, ओसरगाव अनुसूचित जाती स्त्री अशा सात जागांचा समावेश आहे.
२५ एप्रिल ते २ मे या कालावधीत सार्वजनिक सुटी वगळून सकाळी ११ ते ३ यावेळेत अर्ज सादर करण्यात येणार आहेत. छाननी ३ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख ८ मे असून आवश्यक असल्यास मतदान १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे.