शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:57 AM

लोकसभा निवडणूक जाहीर झल्यानंतर जिल्ह्यात गाड्या जाळण्याचे व हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या शहरअध्यक्षा संजिवनी पवार यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार स्वाभिमान पक्षाची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक जाहीर झल्यानंतर जिल्ह्यात गाड्या जाळण्याचे व हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या शहरअध्यक्षा संजिवनी पवार यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, संदीप मेस्त्री,अण्णा कोदे, प्रियाली कोदे, जितू कांबळी, हेलम कांबळी, सूरज पवार, शिवसुंदर देसाई, समर्थ कोळंबकर, बुथअध्यक्ष भक्ती राणे, अंकिता कर्पे, सुरेखा चव्हाण, भारती पाटील, उज्वला ताम्हाणेकर, शुभम देसाई, विराज येडे, चैतन्य मामजी आदी उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा हाणामाऱ्या व राजकीय कार्यकर्त्यांच्या गाड्या जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सावंतवाडी तालुक्यात गृहराज्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची कार अज्ञातांनी पेटवून दिली आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यादृष्टीने गंभीर असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आपला तालुका संभाळू शकत नाहीत. हे यावरून स्पष्ट झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यात अशा प्रकारे बदनामी होत असताना जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावे व लोकसभेची निवडणूक निर्भयपणे व शांततेत पार पाडावी यासाठी कणकवली शहरासह तालुक्यात पोलिसांच्या रात्र गस्तीच्या वेळेत वाढ करावी. निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील वातावरण कलुषित करून पराभवाच्या भीतीने अशा अनुचित घटना करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी.कणकवली शहरात यापूर्वी गाड्या जाळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार पुन्हा शहरात व तालुक्यात घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात सावंतवाडीतील घटनेचा संशय सत्ताधाऱ्यांच्या दिशेने व्यक्त होत असल्यामुळे हे प्रकरण दडपले जाण्याची भीती आहे.

तसेच अश्या घटना वारंवार जिल्ह्यात घडत असल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा घटना घडू नये व शहरातील महिलांना भयमुक्त वातावरणात शहरात फिरता यावे म्हणून कणकवली पोलिसांनी तातडीने गस्तीत वाढ करावी. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग