फोंडाघाटात कार जळून बेचिराख! तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 19:46 IST2022-03-10T19:46:07+5:302022-03-10T19:46:37+5:30
Sindhudurg News : कणकवली तालुक्यातील फोंडाघाटामध्ये एक कार जळून बेचिराख झाल्याची घटना गुरुवारी घडली. ही कार कणकवली तालुक्यातील एका व्यक्तीची असल्याची जोरदार चर्चा आहे.

फोंडाघाटात कार जळून बेचिराख! तर्कवितर्कांना उधाण
कणकवली - कणकवली तालुक्यातील फोंडाघाटामध्ये एक कार जळून बेचिराख झाल्याची घटना गुरुवारी घडली. ही कार कणकवली तालुक्यातील एका व्यक्तीची असल्याची जोरदार चर्चा आहे. तर या कारमध्ये एक व्यक्ती जळाल्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, या चर्चेला पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार त्या कारमध्ये जळलेल्या भागात मानवी बरगड्या सदृश्य काही भाग दिसत असल्याचे समजते. पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर पथकासह घटनास्थळी पोहचले आहे. फोंडाघाटातील घटना ही अपघात की घातपात ? याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.