शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

घरफोडी सत्र सुरूच; महावितरणच्या वायरमनला मारहाण -: पोलीस हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 21:16 IST

शुक्रवारी पहाटे चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती़.

ठळक मुद्देसंशयितावर गुन्हा दाखल : चार महिन्यांचे वीज बिल थकित; गंभीर जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

कणकवली : गेल्या काही महिन्यांत कणकवलीत चोरट्यांचे घरफोडी सत्र सुरूच आहे़ शिवाजीनगरमध्ये गेल्या महिनाभरात तीन वेळा चोरीचा प्रयत्न पंधरा ते वीस ठिकाणी चोरट्यांनी केला आहे़ विविध निवासी इमारतींमध्ये बंद असलेले फ्लॅट लक्ष्य करण्याचे काम चोरटे करीत आहेत़. शुक्रवारी पहाटे चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती़. चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कणकवलीत गस्त वाढविली आहे़कणकवलीत काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत घरफोड्या केल्या. त्यानंतर चोरट्यांनी ग्रामीण भागाला लक्ष्य करीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. आता पुन्हा शहरात चोरीचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांत भीती वाढली आहे.

कणकवलीतील शिवाजीनगर येथील परबवाडी रस्त्यालगत रामेश्वर दिर्बादेवी प्लाझा संकुलात घरफोडी झाल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला आहे़ तसेच या निवासी इमारतीमधील बी विंगमधील दुसºया मजल्यावरील एका फ्लॅटचा कडी कोयंडा तोडलेल्या स्थितीत सकाळी दिसून आला. या घरातील राहणारे भाडेकरू बाहेर होते़ घरात काही विशेष साहित्य नसल्याने चोरट्यांचा डाव फसला़ मात्र पुन्हा कणकवलीत चोरटे सक्रीय झाल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महावितरणच्या वायरमनला मारहाणमालवण : चार महिन्यांचे वीज बिल थकित असल्याने ते भरा असे सांगण्यास गेलेल्या येथील महावितरणचे वायरमन दिगंबर दिनकर मातले यांना रमेश चव्हाण (रा. कुंभारमाठ फोंडेकरवाडी) याने गंभीर मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. जखमी मातले यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील महावितरणचे वायरमन दिगंबर मातले हे सहकारी संदेश मेस्त्री यांच्यासमवेत कुंभारमाठ फोंडेकरवाडी येथे वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले होते.

मालवण तालुक्यातील कुंभारमाठ फोंडेकरवाडीतील रमाकांत विश्वास चव्हाण यांच्या नावे असलेले चार महिन्यांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे ते चव्हाण यांच्या घरी वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या रमेश चव्हाण याला त्यांनी तत्काळ वीज बिल भरा असे सांगितले. वायरमन मातले यांनी चार महिन्यांचे वीज बिल थकीत असल्याने ते लवकर भरा असे सांगितले असता रमेश चव्हाण याने त्यांना मारण्यास सुरुवात केली. मारहाणीत मातले हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी वायरमन मातले यांच्यावर उपचार केले. यावेळी महावितरणचे अधिकारी योगेश खैरे, गुरुदास भुजबळ तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, मंगेश माने यांनी ग्रामीण रुग्णालयात जात घटनेची माहिती दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी