A bull was killed in a car collision at Kudal-Pandoor | कुडाळ-पणदूर येथे कारच्या धडकेत रानडुक्कर ठार

कुडाळ-पणदूर येथे कारच्या धडकेत रानडुक्कर ठार

ठळक मुद्देकुडाळ-पणदूर येथे कारच्या धडकेत रानडुक्कर ठारगाडीचेही नुकसान; घटनास्थळी नागरिकांनी केली गर्दी

कुडाळ : कारची जोरदार धडक बसल्यामुळे रानडुक्कर जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे घडली.दरम्यान या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

याबाबतची माहिती सावंतवाडी चे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोगटे यांनी दिली. यावेळी वनविभागाने या घटनेची दखल घ्यावी,असे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कार महामार्गावरून जात असताना पणदूर येथे अचानक डुक्कर आडवा आला.यावेळी चालकाचा वेगावरील ताबा सुटल्यामुळे गाडीची त्याला जोरदार धडक बसली.यात रानडुक्कर गतप्राण झाला. दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती .त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली.

Web Title: A bull was killed in a car collision at Kudal-Pandoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.