कोकणचे निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवा, नितेश राणे यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 03:53 PM2024-02-26T15:53:02+5:302024-02-26T15:54:01+5:30

कणकवली:   कोकणात निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे. ते पाहण्यासाठी जगातील पर्यटक कोकणात यावेत याकरिता युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स व सोशल ...

Bring the natural beauty of Konkan to the international level, appeals Nitesh Rane | कोकणचे निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवा, नितेश राणे यांचे आवाहन 

कोकणचे निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवा, नितेश राणे यांचे आवाहन 

कणकवली:  कोकणात निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे. ते पाहण्यासाठी जगातील पर्यटक कोकणात यावेत याकरिता युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स व सोशल मीडियावर फेमस असलेल्या कलाकारांनी कोकणातील निसर्ग सौंदर्यावर रिल्स तयार केल्या पाहिजेत. त्या जगभरातील पर्यटकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. कोकणातील सर्वांगसुंदर असलेले निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी कोकणातील क्रियेटर्सनी रिल्स व मिम्स च्या माध्यमातून प्रयत्न करावेत. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मिम्स व रिल कोकण सन्मान स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईट येथे झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या पत्नी नंदिता राणे, मुलगा निमिष राणे, युटूबर्स व एन्फ्ल्यूएंझर्स श्रुतिका कोळंबेकर, मंगेश काकड, सोहम शहाणे, कुहू परांजपे, प्रशांत नाक्ती, वृषाली जावळे, प्रसाद विधाते, शंतनू रांगणेकर, अंकिता प्रभू- वालावलकर, गणेश चनारे, गौरी पवार, सिद्धांत जोशी आदी उपस्थित होते.

राणे म्हणाले, कोकणातील युट्यूब व सोशल मीडियावर रिल्स व मिम्स बनविणाऱ्या कलाकारांना एकत्र आण्यासाठी हिंदू स्पर्धा आयोजित केली आहे. या कालाकारांना व्यासपीठ मिळावे हा हेतू स्पर्धा घेण्यामागील आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षदीपला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी लक्षदीपच्या समुद्र किनारी फोटो काढले होते. त्यानंतर लक्षदीपला भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मालदीव व लक्षदीप प्रमाणेच कोकणातील किनारपट्टी व निसर्ग सौदर्य अप्रतिम आहे. कोकणातील समुद्र किनारे व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगातील पर्यटक याठिकाणी यावेत यासाठी कोकणातील समुद्र किनारे व निसर्ग सौदर्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवणे नितांत गरजेचे आहे. याकरिता युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स व सोशल मीडियावर फेमस असलेल्या कलाकारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रिल्स व मिम्स बनविण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र, त्यांनी रिल्स व मिम्स बनविताना आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. काही दिवसांपूर्वी कणकवलीतील रिल्स बनविणाऱ्या एका कलाकाराचा अपघाती मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर माझे मन्न सुन्न झाले. कारण तुम्ही कलाकार आमच्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहात. त्यामुळे कलाकारांनी रिल्स व मिम्स बनताना जीवितास कोणातीही थोका निर्माण होणार नाही, याची काळाजी घेऊन ते बनवावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Bring the natural beauty of Konkan to the international level, appeals Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.