जिल्हा शल्य चिकित्सकपदी निष्क्रिय माणूस आणला : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:53 AM2020-10-06T11:53:12+5:302020-10-06T11:55:58+5:30

CoronaVirus, sindhudurg, hospital, Parshuram Upkar जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांची बदली करीत त्यांच्या जागेवर दोन वेळा निलंबित झालेल्या श्रीमंत चव्हाण या निष्क्रिय अधिकाऱ्याला आणल्याचा घणाघाती आरोप मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

Bring inactive man as District Surgeon: Parashuram Uparkar | जिल्हा शल्य चिकित्सकपदी निष्क्रिय माणूस आणला : परशुराम उपरकर

जिल्हा शल्य चिकित्सकपदी निष्क्रिय माणूस आणला : परशुराम उपरकर

Next
ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकपदी निष्क्रिय माणूस आणला : परशुराम उपरकररुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

कणकवली : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांची बदली करीत त्यांच्या जागेवर दोन वेळा निलंबित झालेल्या श्रीमंत चव्हाण या निष्क्रिय अधिकाऱ्याला आणले आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्ता असताना जिल्हा रुग्णालयात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची वेळ आली असल्याचा घणाघाती आरोप मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्गातील निवडून आलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जनतेचे आरोग्य राखण्यात अपयशी ठरले आहेत. मालवण येथील महिलेला रुग्णवाहिका साडेपाच तास न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री, खासदार, आमदार केवळ घोषणा करीत आहेत. मेडिकल कॉलेज, महिला रुग्णालय व येथील जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या सेवांचे लोकार्पण करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत. लोकप्रतिनिधींना नागरिकांचे जीव वाचवायचे की गमवायचे आहेत? नागरिकांना आरोग्याच्या विवंचनेत ठेवून केवळ पत्रकबाजी व फोटोसेशन करण्यामध्ये सत्ताधारी रमले आहेत. सर्वच जिल्ह्यातील आरोग्य रुग्णालयांमध्ये दयनीय अवस्था आहे. रुग्णांना सेवा मिळत नाही, अनेक रिक्त पदे आहेत. त्यावर सत्ताधारी मूग गिळून गप्प बसले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण हे दोन वेळा निलंबित झालेले आहेत. कुडाळ रुग्णालयात त्यांची सेवा नागरिकांना माहीत आहे. देवगडमध्ये बदली झाल्यानंतर वर्षभर कामावर हजर झाले नव्हते.

अनेक ठिकाणी त्यांची सेवा फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जिल्हा रुग्णालयात नागरिकांना आरोग्य सेवा मिळणार आहे का? हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Bring inactive man as District Surgeon: Parashuram Uparkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.