शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

आडाळीच्या जिवनदायी ओढ्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 4:49 PM

घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग  या सेवाभावी संस्थेने प्रजासत्ताकदिनी आयोजिलेल्या आडाळी जिवनदायी ओढा पुनरुज्जीवन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला

ठळक मुद्देआडाळीच्या जिवनदायी ओढ्याने घेतला मोकळा श्वासघुंगुरकाठीच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

(आडाळी दोडामार्ग) सिंधुदुर्ग : घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग  या सेवाभावी संस्थेने प्रजासत्ताकदिनी आयोजिलेल्या आडाळी जिवनदायी ओढा पुनरुज्जीवन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि सुमारे शंभर जणांच्या दिवसभराच्या परिश्रमानंतर गेली वीसपंचवीस वर्षे झाडझाडोरा, गाळ, कचरा, मातीने घुसमटलेला ओढ्याचा श्वास मोकळा झाला. पानवळ-बांदा महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी ही किमया करुन दाखवली.दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत व उपाध्यक्ष डॉ. सई लळीत यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. आडाळी येथील ग्लोब ट्रस्टचे अध्यक्ष पराग गावकर, सर्वोन्नत्ती प्रतिष्ठानचे सचिव प्रविण गावकर यांनी ती उचलून धरली.

पानवळ (बांदा) येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ५० स्वयंसेवक यात उत्साहाने सहभागी झाले. आडाळी गावातील युवकांनीही चांगला प्रतिसाद दिला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून दिवसभरात ओढ्याचे रुपच पालटून गेले. प्रवाह बंद पडलेला हा ओढा सायंकाळी खळाळून वाहू लागला. गावातील बागायती, पाणीपातळी राखण्यामध्ये आतापर्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.सकाळी नऊ वाजता सर्वजण गावातील माऊली मंदिरात एकत्र झाले. सतीश लळीत यांनी सर्वांना जलसंवर्धनाचे महत्व सांगून उपक्रमाचा उद्देश विशद केला. गोगटे-वाळके महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. के. के. म्हेत्रे, पराग गावकर यांनी आवश्यक सुचना दिल्या आणि साडेनऊच्या सुमारास सर्व पथकाने श्रमदानाला सुरुवात केली.

सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या या ओढ्यातील वाढलेली झाडी, तसेच पात्रातील लाकडे, कचरा आधी साफ करण्यात आला. नंतर फावडे व घमेल्यांच्या सहाय्याने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली.ओढ्यातील ज्या भागातील काम मानवी शक्तीच्या पलिकडील होते, त्याठिकाणी जेसीबी यंत्राची मदत घेण्यात आली. सायंकाळी ओढ्यावर वनराई बंधारा घालण्यात आला. गेली कित्येक वर्षे या ओढ्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने गाळ व कचऱ्याने भरलेले ओढ्याचे पात्र व झरे मोकळे झाल्याने ओढ्याचे पात्र सफाईनंतर पाण्याने भरुन गेले.

सायंकाळी काम संपल्यानंतर सर्वजण  घुंगुरकाठी भवनमध्ये एकत्र जमले. यावेळी घुंगुरकाठी, ग्लोब ट्रस्ट यांच्यावतीने जेसीबी चालक अनिल राठोड यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

पात्रात अडकलेली मोठमोठी झाडे यादव यांनी कौशल्याने बाहेर काढली. सहभागी एनएसएस विद्यार्थ्यांचा प्रतिकात्मक सत्कार प्रा. म्हेत्रे यांना शाल देऊन करण्यात आला. राष्ट्रगीताने उपक्रमाची सांगता करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर गावकर, संदीप गावकर यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनsindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान