बॉलेरो चालकाचा अतिउत्साहीपणा अंगलट,प्रवाहात गाडी अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 12:34 IST2021-07-12T12:33:33+5:302021-07-12T12:34:33+5:30
Rain Sindhudurg : पुलावर पाणी असताना त्या प्रवाहात बॉलेरो घालण्याचा प्रयत्न करणा-या चालकाला अतिउत्साहीपणा अंगलट आला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.ही घटना आज सकाळी येथील तिलारी राज्यमार्गावरील भेडशी परिसरात घडली.

बॉलेरो चालकाचा अतिउत्साहीपणा अंगलट,प्रवाहात गाडी अडकली
दोडामार्ग: पुलावर पाणी असताना त्या प्रवाहात बॉलेरो घालण्याचा प्रयत्न करणा-या चालकाला अतिउत्साहीपणा अंगलट आला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.ही घटना आज सकाळी
येथील तिलारी राज्यमार्गावरील भेडशी परिसरात घडली.
कॉजवे काल दुपारपासून पाण्याखाली असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.आज सकाळी दोडामार्ग हुन तिलारीच्या दिशेने जात असताना भेडशी येथील कॉजवेवर पाणी असतानाही याच मार्गाने वाहतूक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा अतिउत्साही नडला.व ते वाहन पाणी असलेल्या कॉजवेवर अडकल्याची घटना घडली.
भेडशी येथील स्थानिक नागरिक ,युवक हे अडकलेले वाहन काढण्यासाठी सरसावले आणि ही मालवाहू गाडी बाहेर काढण्यात त्यांना यश आले.मात्र चालकाच्या अतिउत्साहीपणाबद्दल उपस्थित सर्वांनीच संताप व्यक्त केला.