शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी होणार

By admin | Updated: November 16, 2014 00:23 IST

शिक्षण विभाग : अलाहाबाद मुक्त विद्यापीठाच्या पदवीधरांचाही समावेश

रहिम दलाल / रत्नागिरी परराज्यातील विद्यापीठातून बोगस पदवी धारण केलेल्या जिल्हा परिषदेच्या बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी करण्यात येणार असल्याने शिक्षकवर्गामध्ये खळबळ उडाली आहे़ या बोगस पदव्यांकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग कानाडोळा करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ शिक्षण अर्धवट राहिलेल्या अनेकजणांनी मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राज्यातील मुंबई मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून पदवी घेतली आहे़ कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली व अन्य राज्यातील मुक्त विद्यापीठातून हजारो लोकांनी पदव्या मिळविल्या आहेत. इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकऱ्या करणारे आणि जिल्हा परिषदेतील अनेक प्राथमिक शिक्षकांनी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदव्या धारण करुन त्याद्वारे पदोन्नती मिळविण्यासाठी धडपड सुरु केली आहे.गेल्या चार-पाच वर्षांमध्ये शिक्षण विभागाने अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नतीही दिलेली आहे. त्यावेळी शिक्षण विभागाकडून त्याबाबत काहीही चौकशी न करताच त्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीच्यावेळी जिल्ह्यातील १४० प्राथमिक शिक्षकांनी अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदवीधर झाल्याचे समोर आले होते़ त्यावेळी ती पदवी बोगस ठरवून तत्कालीन शिक्षण सभापती सतीश शेवडे यांनी त्या शिक्षकांना पदोन्नती नाकारली. पदोन्नती नाकारल्याने त्या शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. संबंधित शिक्षण विभागाने यापूर्वी अलाहाबाद विद्यापीठातून पदवीधर झालेल्या शिक्षकांना पदोन्नती कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला होता़ यापूर्वीही अलाहाबाद मुक्त विद्यापीठ व परराज्यातील इतर विद्यापीठांकडून बोगस पदवी धारण केलेल्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती़ त्या शिक्षकांची चौकशी करुन पदोन्नती रद्द करण्याची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी काही शिक्षकांनी केली होती़ त्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते़ मात्र, शिक्षण समितीच्या सभेत याविषयी जोरदार चर्चा झाली़ सदस्य विलास चाळके व अन्य सदस्यांनी बोगस पदवीधर असलेल्या शिक्षकांची चौकशी करण्याची मागणी केली़ त्यामुळे आता या बोगस पदवी धारण करुन पदोन्नती देण्यात आलेल्या शिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे़