सांगेली नदीपात्रात मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:45 IST2019-12-20T14:42:56+5:302019-12-20T14:45:22+5:30

सावंतवाडी : सांगेली येथील नवपाथर परिसरातील नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र नंतर हा मृतदेह ओवळीयेचे माजी सरपंच ...

The body was found in the Sangli riverbed | सांगेली नदीपात्रात मृतदेह सापडला

सांगेली नदीपात्रात मृतदेह सापडला

ठळक मुद्देसांगेली नदीपात्रात मृतदेह सापडलानदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ

सावंतवाडी : सांगेली येथील नवपाथर परिसरातील नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र नंतर हा मृतदेह ओवळीयेचे माजी सरपंच शांताराम शिवराम सावंत (६२) यांचा असल्याचे समजले. ते गुरूवारी सकाळी बागायतीमध्ये जात होते. त्यावेळी त्याना हदयविकाराचा धक्का बसल्याने ते नदीत पडले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सावंत हे नेहमी सकाळी बागायतीमध्ये जात. ते नदीतूनच बागायतीत गेले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी नदीपात्रात मृतदेह असल्याने प्रथम ओळख पटत नव्हती. मात्र नंतर ते ओवळिये येथील असल्याचे समजले.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सावंत यांनी सरपंच पदाच्या काळात गावात अनेक उपक्रम राबविले होते. गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या हायस्कूलच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

Web Title: The body was found in the Sangli riverbed