कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल

By सुधीर राणे | Updated: October 31, 2022 11:33 IST2022-10-31T11:30:32+5:302022-10-31T11:33:50+5:30

अद्याप व्यक्तीची ओळख पटली नाही.

Body of unknown person found in Gadandeepatra in Kankavli | कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल

कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल

कणकवली : कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या गडनदी पात्रातील केटी बंधाऱ्याच्यावरील भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आज, सोमवारी सकाळी आढळून आला आहे. याबाबत माहिती मिळताच कणकवली पोलीस हवालदार चंद्रकांत माने, मंगेश बावधने, यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

साधारणता ४५ ते ५० वर्षीय असलेली ही व्यक्ती गुडघाभर पाण्यामध्ये बुडलेल्या स्थितीत काहींना आढळून आली. त्यानंतर  माहिती देताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नाही. राखाडी कलरची ट्रॅक पॅन्ट व मरून कलरचा फुल हाताचा शर्ट असा त्या व्यक्तीचा पेहराव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तो मृतदेह नदीपात्रातून स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला असून त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Body of unknown person found in Gadandeepatra in Kankavli