धामापूर तलावात प्रौढाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:00 IST2019-11-16T10:58:50+5:302019-11-16T11:00:12+5:30
मालवण तालुक्यातील पेंडूर मोगरणे येथील देवानंद जनार्दन काटकर (४२) यांचा मृतदेह बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामापूर तलावात दिसून आला. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

धामापूर तलावात प्रौढाचा मृतदेह सापडला
मालवण : तालुक्यातील पेंडूर मोगरणे येथील देवानंद जनार्दन काटकर (४२) यांचा मृतदेह बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामापूर तलावात दिसून आला. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
देवानंद हे बुधवारी दुपारी घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. रात्री त्यांचा मृतदेह धामापूर तलावात दिसून आला. त्यांचे कपडे तलावाच्या बाहेर होते. देवानंद याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येत होते.
देवानंद यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र ते आंघोळीसाठी तलावात उतरले असतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यांच्या पश्चात आई व दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार आर. व्ही. मुंडे करत आहेत.