शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

अंध बांधवांना सर्वतोपरी मदत गरजेची

By admin | Updated: October 16, 2015 22:41 IST

अनंत उचगावकर : कणकवलीत जागतिक पांढरी काठी दिन

कणकवली : अंध बांधव हे समाजातील एक घटक आहेत. ते स्वावलंबी होण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करीत असतात. समाजऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना आपण सर्वांनी सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे, असे मत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी व्यक्त केले.येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात गुरुवारी जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब आॅफ कणकवली सेंट्रल तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी नॅबचे सचिव गजानन तेंडुलकर, खजिनदार भालचंद्र कशाळीकर, विकास अधिकारी माधव ताटकर, रोटरी क्लबच्या अध्यक्षा मेघा गांगण, सचिव अनिल कर्पे, दीपक बेलवलकर, नितिन बांदेकर, वर्षा बांदेकर, धनंजय कसवणकर, डॉ. सुहास पावसकर, अंकिता कर्पे, अ‍ॅड. दीपक अंधारी, संतोष कांबळी, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप सोरटे, पॅराडाईज फाऊंडेशनचे विनय सावंत उपस्थित होते.यावेळी बोलताना अनंत उचगावकर पुढे म्हणाले, नॅबतर्फे अंध बांधवाना मुंबईसारख्या शहरात फिरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते हळूहळू स्वावलंबी बनत आहेत. तसेच अनेकजण व्यवसाय करीत आहेत. ही सर्व प्रगती पांढऱ्या काठीच्या आधारावर होत आहे. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लबने समाजसेवेचा घेतलेला हा वसा उल्लेखनीय असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले. यावेळी अंध बांधवाना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करण्यात आले. अंध बांधवांसाठी निधी जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. काही अंध बांधवांनी गितेही सादर केली. त्यालाही उपस्थितांकडून चांगली दाद मिळाली. (वार्ताहर)