सिंधुदुर्गनगरी : तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लोकनियुक्त सत्तेचा सूर्योदय झाला आहे. अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी शिंदेसेनेचे दादा साईल यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेताच ओरोस येथील 'मिनी मंत्रालय' कार्यकर्त्यांच्या गर्दीने आणि शुभेच्छांच्या वर्षावाने ओसंडून वाहत होते.पीठासन अधिकारी शुभांगी साठे यांनी ही निवड जाहीर करताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. प्रमोद कामत हे जिल्ह्याचे ३३ वे अध्यक्ष ठरले आहेत.बांद्याचे भाग्य उजळले!बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या प्रमोद कामत यांना पहिल्याच टर्ममध्ये जिल्ह्याचे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी मिळाली आहे. सावंतवाडी तालुक्याला अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागात उत्साहाचे वातावरण आहे.अनुभवाची शिदोरी; चैतन्य परतलेउपाध्यक्ष दादा साईल यांना १० वर्षांच्या सरपंचपदाचा दांडगा अनुभव असून, त्यांच्या रूपाने जिल्हा परिषदेला अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. चार वर्षांपासून कुलूपबंद असलेली पदाधिकारी दालने सोमवारी कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली होती.
Web Summary : After four years, Sindhudurg Zilla Parishad sees BJP's Pramod Kamat elected as President and Shinde Sena's Dada Sail as Vice-President. Celebrations erupted as the newly elected officials assumed their roles, filling the 'mini ministry' with supporters.
Web Summary : चार साल बाद, सिंधुदुर्ग जिला परिषद में भाजपा के प्रमोद कामत अध्यक्ष और शिंदे सेना के दादा साईल उपाध्यक्ष चुने गए। नए निर्वाचित अधिकारियों के पदभार ग्रहण करते ही जश्न मनाया गया, जिससे 'मिनी मंत्रालय' समर्थकों से भर गया।