शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हे तर आमच्या जीवावर निवडून आलेले भुरटे, आशिष शेलारांची विनायक राऊतांवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:50 IST

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था म्हणजे काप गेला भोका रवली

मालवण : विनायक राऊत आम्हाला बाजार बुणगे बोललेत, परंतु आम्ही त्यांना सांगतो, तुम्ही भुरटे चोर आहात. भुरट्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. विनायक राऊत हे आमच्या जीवावर जिंकून आलेत, प्रचाराला मोदींची सभा आणि फोटो लावलेत, राऊतांची अवस्था म्हणजे मालवणी भाषेत सांगायचे झाले तर, धाक नाय दरारो, फुकटचो नगारो, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.ते भाजपा आनंद मेळाव्यामध्ये बोलत होते. खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना भाजपाच्या आनंद मेळाव्यावर टीका केली होती. भाजपाचा आनंद मेळावा बाजार बुनग्यांचा मेळावा असे राऊत म्हणाले होते.शेलार पुढे म्हणाले, भाजपा आनंद निमित्ताने आंगणेवाडी येथे रेकॉर्ड ब्रेक सभा पहावयास मिळत आहे, भारतीय जनता पक्षाच्या कामाचे विराट दर्शन याठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या आमच्या शिलेदारांकडे पाहून होत आहे. आताच समजलं तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था म्हणजे काप गेला भोका रवली. आत्ताच मगाशी आमदार नितेश राणे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मी त्यांना सांगू इच्छितो की पुढच्या आनंद मेळाव्याला या ठिकाणी अधिकच्या दीडशे खुर्च्या लावा, मुंबई महानगर पालिकेचे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे दीडशे नगर सेवक आणि महापौर सुद्धा इथे आणणार आहोत.फडणवीस त्याचा बॅकलॉग भरून काढतील- निलेश राणेनिलेश राणे म्हणाले, मालवण तालुका याठिकाणी यजमानी तालुका आहे. आज जवळपास साडेआठ वर्ष झाली, इथे आमचा खासदार, आमदार नाही. या काळात जिल्ह्याला विकास निधी निधी पासून ठाकरे सरकारने वंचित ठेवले. आता या जिल्ह्याचा बॅकलॉग फडणवीसच भरून काढू शकतात. आज आमचा हक्क आहे म्हणून आम्ही विनंती करतो. आपण या जिल्ह्यावर आशीर्वादाचा हात ठेवला तर या जिल्ह्याचा कायापालट होवू शकतो.पुढच्या मेळाव्यात या ठिकाणी दीडशे दीडशे खुर्च्या लावून मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि नगरसेवक मेळाव्याला आणणार असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाचा विकास पर्यटनाने कृषी उद्योगाच्या माध्यमातून हाती घेणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत