भाजपाने केला कृषी विभागाच्या भोंगळ कारभार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 02:07 PM2021-08-03T14:07:06+5:302021-08-03T14:09:22+5:30

Bjp Sindhdudurg : कणकवली तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अडीच महिने होऊन देखील पूर्ण करण्यात आले नसल्याने आक्रमक झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना सोमवारी धारेवर धरले.

BJP exposes mismanagement of agriculture department | भाजपाने केला कृषी विभागाच्या भोंगळ कारभार उघड

कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांची भाजप पदाधिकार्यांनी भेट घेऊन चर्चा केली.

Next
ठळक मुद्देतौक्ते वादळाने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत भाजपा शिष्टमंडळाकडून कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

कणकवली : तौक्ते वादळाने कणकवली तालुक्यात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई रक्कम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. पण कणकवली तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अडीच महिने होऊन देखील पूर्ण करण्यात आले नसल्याने आक्रमक झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना सोमवारी धारेवर धरले.

यावेळी टोलवाटोलवी करत हजारे यांनी आम्हाला काही गावामध्ये तलाठ्यांचे सहकार्य मिळत नाही आणि काही कर्मचारी रजेवर असल्याचे उत्तर देत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र,भाजपाच्या शिष्टमंडळाने याबाबत थेट तहसीलदारांची भेट घेत ही बाब निदर्शनास आणली.

यावेळी हजारे यांना कणकवली तहसीलदार कार्यालयात बोलावून घेत कुठले तलाठी सहकार्य करत नाही ते सांगा. अडीच महिने झाले तरी तौक्ते वादळाच्या भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा झाले नाहीत.

अद्याप कृषी विभागाचे पंचनामे पूर्ण का झाले नाही ? शेतकऱ्यांकडून काही आर्थिक हितसंबंध जपण्यासाठीच तुम्ही पंचनामे पूर्ण करत नाहीत का ? सावंतवाडी कुडाळ मध्ये नुकसानग्रस्तांना मदत जमा झाली व कणकवलीत का होत नाही ? अशाप्रकारे अनेक प्रश्नांचा भडीमार करत कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले . तसेच आम्हाला कारणे नकोत , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चालढकल करणाऱ्या या बेजबाबदार कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे , अशी भूमिका घेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी हजारे यांच्या विरोधात तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवा व यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.

तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळण्यास तालुका कृषी अधिकारी हेच कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाई करा. कारवाई झाली नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषण करू असा इशाराही भाजपाकडून देण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री , पंचायत समिती सदस्य गणेश तांबे , नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत , भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री , असलदे सरपंच पंढरी वायगणकर , शहराध्यक्ष अण्णा कोदे , प्रदीप गावडे , बाळा पाटील , संतोष पुजारे , साहिल शिरवडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: BJP exposes mismanagement of agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.