शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:00 IST

महायुतीचे नऊ विरूद्ध आठ संख्याबळ झाल्याने फायदा

देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायत विषय समिती  सभापतीपदाची व महिला बालकल्याण उपसभापतीपदाच्या निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपप्रणित देवगड - जामसंडे नगरविकास समितीने बाजी  मारली. बांधकाम समिती सभापतीपदी गटनेते शरद ठुकरुल, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापतीपदी  प्रणाली माने, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी  आद्या गुमास्ते, तसेच महिला बालकल्याण उपसभापती ऋचाली पाटकर यांची निवड झाल्याचे निवडणूक पीठासन अधिकारी कातकर यांनी जाहीर केले.देवगड - जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती व महिला बालकल्याण उपसभापतीपदाची निवडणूक बुधवारी नगरपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय तथा पीठासन अधिकारी जगदीश कातकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगरपंचायतीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक व नगरसेविका आदी उपस्थित होते. नगरपंचायत सभागृहात झालेल्या या विषय समिती सभापती निवडीनंतर बांधकाम समितीत सदस्यपदी तन्वी चांदोस्कर, निवृत्ती उर्फ व बुवा तारी, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सदस्यपदी  स्वरा कावले व संतोष तारी, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यपदी विशाल मांजरेकर, मनीषा जामसंडेकर, तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी ऋचाली पाटकर आदींची निवड करण्यात आली. नगरपंचायतीवर यापूर्वी शिवसेना गटाची सत्ता होती. त्यावेळी नऊ सदस्य संख्या असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे सदस्य भाजपच्या गटात सामील झाल्याने सद्यस्थितीत महाविकास आघाडीमहायुतीची संख्या ८ विरूद्ध ९ झाल्याने नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.भाजपकडून अभिनंदनदेवगड - जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपचे विषय समिती सभापती विराजमान झाल्यानंतर भाजप नेते बाळा खडपे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, संतोष किंजवडेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर, संजना आळवे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, दयानंद पाटील, संजय तारकर, गणपत गावकर, मिलिंद माने, रवींद्र चिंदरकर, सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी