वाढीव वीजबिलांबाबत भाजप आक्रमक, वीज वितरणचे अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:16 IST2020-08-10T16:14:27+5:302020-08-10T16:16:22+5:30
कोरोना महामारीत वाढीव आलेली वीज बिले नागरिकांचे कंबरडे मोडणारी असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. या प्रश्नी भाजपाच्यावतीने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

वाढीव वीज बिलप्रश्नी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी रणजित देसाई, ओंकार तेली, राकेश कांदे, संदेश नाईक आदी उपस्थित होते.
कुडाळ : कोरोना महामारीत वाढीव आलेली वीज बिले नागरिकांचे कंबरडे मोडणारी असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. या प्रश्नी भाजपाच्यावतीने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
वीज बिल दरवाढीविरोधात कुडाळ भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले. या प्रश्नी वीज वितरणच्या कार्यालयात त्यांनी धडक दिली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, कुडाळ शक्ती केंद्रप्रमुख राजू बक्षी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, नगरसेवक सुनील बांदेकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, निलेश तेंडुलकर, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, राजवीर पाटील, प्रितेश गुरव, प्रसन्न गंगावणे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे गेले चार महिने सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडलेला असताना महावितरण कंपनीने दिलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने उपअभियंता लोकरे यांना शनिवारी चांगलेच धारेवर धरले.
कोरोना महामारीने गेले ४ महिने सामान्य माणूस आधीच मेटाकुटीस आलेला असताना कुडाळतील नागरिकांना जास्तीची आलेली बिले ही कंबरडे मोडणारी आहेत. त्यामुळे आपत्तीच्या काळात नागरिकांसमोर ही एक वेगळीच आपत्ती आली आहे.
नागरिकांकडून वीज बिलापोटी जास्तीचे पैसे आकारण्यात आले आहेत ती रक्कम नंतरच्या बिलात कमी केली जाणार आहे, असे आश्वासन लोकरे यांनी दिले. कुडाळ नगरपंचायतीची वेळोवेळी महावितरणकडून बदनामी केली जाते. ती थांबवण्यात यावी, असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले.
दंडात्मक कारवाई करू नये
कोकणातील माणूस वेळेवर बिल भरत असूनही लोकांना जास्तीची बिले पाठविण्यात आली आहेत. गणेश चतुर्थी तोंडावर असताना लोकांना कसल्याही प्रकारची जोर जबरदस्ती करू नका, असे रणजित देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करू नये असे रणजित देसाई यांनी यावेळी सांगितले.