'बीडपेक्षा सिंधुदुर्गात मोठी दहभत! नग्न करुन तरुणाची हत्या केली'; वैभव नाईकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:17 IST2025-04-15T14:06:34+5:302025-04-15T14:17:03+5:30

बीडपेक्षाही सिंधुदुर्गात मोठी दहशतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे, असा गंभीर आरोप, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.

Bigger fire in Sindhudurg than Beed Young man was murdered by being stripped naked Vaibhav Naik's serious allegation | 'बीडपेक्षा सिंधुदुर्गात मोठी दहभत! नग्न करुन तरुणाची हत्या केली'; वैभव नाईकांचा गंभीर आरोप

'बीडपेक्षा सिंधुदुर्गात मोठी दहभत! नग्न करुन तरुणाची हत्या केली'; वैभव नाईकांचा गंभीर आरोप

बीडपेक्षाही सिंधुदुर्गात मोठी दहशतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे, असा गंभीर आरोप, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. काही दिवसापूर्वी सिद्धिविनायक बिडवलकर या तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता माजी आमदार नाईक यांनी गंभीर आरोप केले. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी या प्रकरणी आरोप केले. 

खाजगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेला गमवावा लागला जीव;अलिबाग मधील घटना

"कुडाळ तालुक्यातील चेंदवण या गावातील सिद्धिविनायक बिडवलकर (वय ३५) या तरुणाचा केवळ हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नग्न करून मारले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. यातील सिद्धेश शिरसाटचे शिंदे गटातील अनेक लोकांशी आहेत. त्याचे बॅनर कालपर्यंत होते. या प्रकरणी सिद्धेशला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि तेथील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलिसांना फोन केले आहेत. त्यामुळे यांचा खरा “आका” कोण?, या सिद्धेश शिरसाटचा खरा आका कोण? असा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना आहे, असा सवालही माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.

'आका' शोधला पाहिजे'

 वैभव नाईक म्हणाले, पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे. ज्यांनी कोणी या तपासात दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत. या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र आंदोलन करणार असून  या परिस्थितीचा “आका” हे पोलिसांनी शोधले पाहिजे, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Web Title: Bigger fire in Sindhudurg than Beed Young man was murdered by being stripped naked Vaibhav Naik's serious allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.