शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

'भोसले सैनिक स्कूल'मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शौर्य परंपरेला नवा आयाम, मंत्री नितेश राणेंचे गौरवोद्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:18 IST

कोकणात होत असलेल्या पहिल्या सैनिक स्कूलचे भूमिपूजन 

सावंतवाडी : निसर्ग संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याला  शौर्याचा व संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिले सैनिक स्कूल म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा हा क्षण आहे. ‘भोसले सैनिक स्कूल’मूळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम प्राप्त होणार आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचालित केंद्रीय संरक्षण मंत्रालय भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त कोकणातील पहिले सैनिक स्कूल ‘भोसले सैनिक स्कूल‘ चे भूमिपूजन मंत्री राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार दीपक केसरकर, मनीष दळवी, अच्युत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता भोंसले, सचिव संजीव देसाई, रत्नेश सिन्हा, श्रीकांत वालवडकर, निरज चौधरकर, विनय देगांवकर उपस्थित होते.राणे म्हणाले, अलिकडेच मालवण किनारपट्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘नौदल दिन’ साजरा करण्यात आला. तो सोहळा जिल्ह्यासाठी एक भूषण ठरला होता. त्यामुळे जिल्ह्याचं सैनिकांप्रती असलेलं योगदान लक्षात घेता असं स्कूल आपल्या जिल्ह्यात उभी राहत आहे हे देखील भूषणावह आहे. सैनिक स्कूल होणे ही येथील मुलांसाठी सुवर्णसंधी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. तर यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे पालकमंत्री या नात्याने अभिनंदन करतो. कारण संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मेहनत व कष्ट घ्यावे लागतात असे गौरवोद्गार राणे यांनी काढले.केसरकर यांनी आपण अच्युत भोसले याच्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. त्यांनी पॉलिटेक्नीक उभारले त्यानंतर आपला प्रवास सुरू केला तो वाखण्यजोगे असाच होता असे म्हणाले. मी शिक्षण मंत्री होतो त्यामुळे मला या मागे किती कष्ट घ्यावे लागतात हे माहित आहे. भोसले यांचा प्रवास मोठा आहे असे ही केसरकर म्हणाले.यावेळी अच्युत भोसले यांनी छोट्या फिल्म रूपी सैनिक उभारण्यात येणार असल्याचे सर्व गोष्टीचा उलगडा केला तसेच यात सर्वानी हातभार लावला त्याचे आभार मानले. तर राकेश सिन्हा यांनी ही सैनिक स्कूल च्या भविष्यातील कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचा गौरव करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhosale Sainik School: New dimension to Sindhudurg's bravery, says Minister Rane.

Web Summary : Minister Nitesh Rane hails the Bhosale Sainik School as a golden opportunity, adding a new chapter to Sindhudurg's military legacy. The school's foundation stone was laid recently.