Sindhudurg: गुड फ्रायडेचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:03 IST2025-04-19T17:01:47+5:302025-04-19T17:03:45+5:30
कणकवली : वरवडे, फणसनगर येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. यात ...

Sindhudurg: गुड फ्रायडेचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांचा हल्ला
कणकवली : वरवडे, फणसनगर येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव जखमी झाले असून त्यातील ४० जणांवर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारा गुड फ्रायडे निमित्तचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांनी हा हल्ला केला. तत्पूर्वी ख्रिश्चन बांधवानी रॅली काढली. तसेच प्राथना सुरू असताना हा हल्ला झाला. या मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उध्दवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तसेच पोलिस निरीक्षक मारुती जगतापही दाखल झाले होते.
डॉ. पंकज पाटील यांच्यासहित डॉ. अक्षय पाटील, डॉ. अजय शृंगारे, डॉ. सुजीता मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज बी यांच्या सहित मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज बी त्यांच्या सहित प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका नुपूर पवार, दिपाली ठाकूर, नयना मुसळे यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांनी उपचार केले.
या कार्यक्रमाच्या वेळी लावण्यात आलेल्या स्पिकरच्या आवाजामुळे मधमाशांचे मोहळ उठले असावी अशी शक्यता प्रत्यक्षदर्शी कडून व्यक्त करण्यात येत आहे. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. फोंडाघाट, घोणसरी, करूळ, साकेडी, कणकवली, वरवडे -फणसवाडी येथील ख्रिश्चन बांधव या गुड फ्रायडेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.