बांदा दशक्रोशीत माकडतापाचा दुसरा बळी, परिसरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:15 AM2020-03-18T11:15:11+5:302020-03-18T11:19:37+5:30

बांदा दशक्रोशीत माकडतापाने दुसरा बळी घेतला आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिनेश शांताराम देसाई (४५, डेगवे, मोयझरवाडी) यांचा माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर बांबोळी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना हवी तशी साथ देत नव्हती. माकडतापाचा दुसरा बळी गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Banda Dashakrohi second victim of mosquito neglect | बांदा दशक्रोशीत माकडतापाचा दुसरा बळी, परिसरात खळबळ

बांदा दशक्रोशीत माकडतापाचा दुसरा बळी, परिसरात खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देबांदा दशक्रोशीत माकडतापाचा दुसरा बळी, परिसरात खळबळ डेगवेतील प्रौढाचा बांबोळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

बांदा : बांदा दशक्रोशीत माकडतापाने दुसरा बळी घेतला आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिनेश शांताराम देसाई (४५, डेगवे, मोयझरवाडी) यांचा माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर बांबोळी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना हवी तशी साथ देत नव्हती. माकडतापाचा दुसरा बळी गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

डेगवे मोयझरवाडी येथील दिनेश देसाई यांचा अहवाल माकडताप पॉझीटिव्ह आला होता. ८ फेब्रुवारी रोजी त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालविली.

पंधरा दिवसांपूर्वी पडवे माजगाव येथील लक्ष्मण शिंदे यांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत माकडताप पॉझीटीव्ह तीन रूग्ण बांबोळीत उपचारासाठी दाखल झाले असून पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तिसरा रूग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

Web Title: Banda Dashakrohi second victim of mosquito neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.