शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

निधी गैरव्यवहारप्रकरणी बांबुळी ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 6:06 PM

कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना दोषी धरत निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देत्रयस्थ समितीची चौकशी पूर्णमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना दोषी धरत निलंबित करण्यात आले आहे.

 कुडाळ गटविकास अधिकारी स्तरावरून आलेल्या चौकशी अहवालावर जिल्हा परिषद प्रशासनाचे समाधान न झाल्याने देवगड गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीची चौकशी पूर्ण झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग निधीत अनियमितता असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झाली होती. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश कुडाळ गटविकास अधिकारी यांना दिले होते.

त्यानुसार चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर चौदाव्या वित्त आयोग निधीत अनियमितता आढळून आली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी बांबुळी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर याला ७ एप्रिल रोजी निलंबित केले होते.बांबुळी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग खात्यातील निधी काढण्यासाठी ग्रामसेवकासोबत सरपंच यांचीही स्वाक्षरी झालेली आहे. तरीही कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालात सरपंचांना क्लीन चिट दिली होती.

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी या चौकशीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चौकशी समितीने पारदर्शक चौकशी केली नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीची तटस्थ चौकशी होणे गरजेचे असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देवगड गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली त्रयस्थ चौकशी समिती पुन्हा नियुक्त केली होती.बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीतील १० ते १५ लाख रुपये कोणतीही विकासकामे न करता परस्पर काढण्यात आले होते. त्यामुळे या ग्राम पंचायतीमध्ये मोठ्या स्वरूपाचा आर्थिक घोटाळा झाल्याचे पुढे आले होते.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून कुडाळ गटविकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची चौकशी होवून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता.आंबडपालमधील त्या कारभाराची चौकशीनिलंबित ग्रामसेवक कसालकर हे बांबुळी ग्रामपंचायतीपूर्वी कुडाळ तालुक्यातीलच आंबडपाल ग्रामपंचायतीत कार्यरत होते. तेथेही त्यांनी असाच प्रताप केला होता. लाखो रुपयांची अनियमितता होती. तेथे याबाबत तक्रार झाल्यानंतर त्यांची तेथून बांबुळी येथे बदली झाली होती. मात्र, तेथील असलेली अनियमिततेची रक्कम भरण्यासाठी त्यांनी बांबुळी ग्रामपंचायतीत पुन्हा तोच प्रकार केला.

तेथील रक्कम भरली. पण देवगड समितीने या आंबडपाल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामसेवक कसालकर यांच्या कारभाराची चौकशी केली आहे. ग्रामसेवक यांनी ती रक्कम भरली असली तरी त्यांच्यावर अनियमितता केल्याचा ठपका राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग