Sindhudurg: चक्कर येऊन पडला, भाजी विक्रेता युवकाचा मृत्यू झाला; वेंगुर्ल्यातील घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 28, 2025 15:59 IST2025-02-28T15:58:17+5:302025-02-28T15:59:39+5:30
प्रथमेश गुरव वेंगुर्ला : वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी व वेंगुर्ला बाजारपेठमधील भाजी विक्रेता अतुल सुनील केरकर (वय २५) याचा हृदयविकाराच्या ...

Sindhudurg: चक्कर येऊन पडला, भाजी विक्रेता युवकाचा मृत्यू झाला; वेंगुर्ल्यातील घटना
प्रथमेश गुरव
वेंगुर्ला : वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी व वेंगुर्ला बाजारपेठमधील भाजी विक्रेता अतुल सुनील केरकर (वय २५) याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, अतुल केरकर हा वेंगुर्ला बाजारपेठ येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. गुरुवारी (दि.२७) अतुल भाजी विक्रीच्या ठिकाणी अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याला आजूबाजूच्या व्यावसायिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मृत घोषित केले.
काही दिवस अगोदर त्याच्या छातीत दुखत असल्याने अतुलवर उपचार सुरू होते. मात्र अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबाला धक्का बसला. या घटनेबाबत वेंगुर्ला शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे.