बांदा येथे भरवस्तीतील घरात चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:07 IST2019-08-03T16:07:32+5:302019-08-03T16:07:49+5:30
बांदा-गवळीटेंब येथे भरवस्तीत असलेल्या घराचा दरवाजा उघडून दोघा युवकांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील व्यक्तींची चाहूल लागताच त्या युवकांनी पळ काढला. स्थानिक युवकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र चोरटे पसार झाले. भरदिवसा घरात घुसण्याचे प्रकार होऊ लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बांदा येथे भरवस्तीतील घरात चोरीचा प्रयत्न
बांदा : बांदा-गवळीटेंब येथे भरवस्तीत असलेल्या घराचा दरवाजा उघडून दोघा युवकांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील व्यक्तींची चाहूल लागताच त्या युवकांनी पळ काढला. स्थानिक युवकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र चोरटे पसार झाले. भरदिवसा घरात घुसण्याचे प्रकार होऊ लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांदा शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील भरवस्तीतही लावण्यात यावेत अशी मागणी होत आहे. चोरीबाबत पोलीस स्थानकांत कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी दोन संशयित युवक गडगेवाडी येथे चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. त्यांनी या परिसरात दोन ते तीन वेळा घिरट्यादेखील घातल्या, मात्र स्थानिकांनी विचारणा करताच त्यांनी तेथून पळ काढला. त्यांच्या पेहरावावरून हे दोघे युवक परप्रांतीय वाटत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.