आशिष झांट्ये राज्यात प्रथम, नीट परीक्षेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:35 IST2020-10-19T13:33:31+5:302020-10-19T13:35:49+5:30
NEET EXAM Result, Education Sector, sindhudurg वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यात मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याने ७१० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

नीट परीक्षेत आशिष याने यश मिळविल्याने वडील डॉ. अविनाश व आई डॉ. शिल्पा झांट्ये यांनी त्याचे पेढा भरून अभिनंदन केले.
मालवण : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यात मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याने ७१० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
नीट परीक्षा निकालात ओडिशाचा शोएब आफताब व दिल्लीच्या आकांक्षा सिंग यांनी ७२० गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला. तर मालवणच्या आशिष झांट्ये याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तेजोमय नरेंद्र वैद्य, पार्थ संजय कदम व अभय अशोक चिल्लरगे या तिघांनी ७०५ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
देशातील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ५० विद्यार्थ्यांमध्ये या चार जणांचा समावेश आहे. १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. अखेर उशिराने हा निकाल जाहीर झाला.