शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कलात्मक विकासही महत्त्वाचा

By admin | Updated: January 1, 2015 21:26 IST

पेडणेकर : बांदा खेमराज मेमोरियलच्या स्नेहसंमेलनात फॅशन परेड

बांदा : स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये विविधांगी गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कलात्मक विकासही महत्त्वाचा आहे. खेमराज हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी फॅशन परेडमधून सादर केलेली कला कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी केले.बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. याचे उद्घाटन पेडणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, स्वप्निल नाईक, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एम. डी. मोरबाळे, कार्यकारिणी सदस्य रुपेश पंडित, समन्वय समिती सचिव देविदास मोरे, मुख्याध्यापक बी. व्ही. देसाई, शालेय समिती सदस्य सदानंद महाजन, उपमुख्याध्यापक शिवाजी दळवी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बी. व्ही. देसाई यांनी केले. यावेळी गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.माध्यमिक, उच्च माध्यमिक व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा साकारत फॅशन परेड सादर केली. तसेच स्वच्छता अभियान, अष्टविनायक दर्शन आणि दशावताराची झलक सादर करून वाहवा मिळविली.आबासाहेब तोरसकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. संस्था संचलित शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. यावेळी श्वेता कोरगावकर, स्वप्निल नाईक, रुपेश पंडित, एम. डी. मोरबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक हनुमंत मालवणकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)