१० रुपयांवरून वाद! तरुणीने लगावली एसटी कंडक्टरच्या श्रीमुखात; बांदा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 12:12 IST2023-08-19T12:12:24+5:302023-08-19T12:12:46+5:30
वाहकाने एसटी बांदा कट्टा कॉर्नर येथे थांबवत बांदा पोलिसात तक्रार दाखल केली.

१० रुपयांवरून वाद! तरुणीने लगावली एसटी कंडक्टरच्या श्रीमुखात; बांदा येथील घटना
बांदा (सिंधुदुर्ग ) : एसटीच्या तिकीटाचे पैसे जास्त घेतल्याच्या रागातून युवतीने वाहकाच्या श्रीमुखात भडकवल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी बांद्यात घडली. वाहकाने बांदा पोलिसात युवती विरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा येथून दोडामार्ग येथे सायंकाळी जाणाऱ्या एसटीत युवती बसली होती. वाहकाने २० रुपये तिकीट दर सांगितला. मात्र युवतीने नकार देत १० रुपये देणार असल्याचे सांगितले. यावरून वाद होत युवतीने वाहकच्या श्रीमुखात भडकवली.
वाहकाने एसटी बांदा कट्टा कॉर्नर येथे थांबवत बांदा पोलिसात तक्रार दाखल केली. बस मधील प्रवाशांना दुसऱ्या बस मधून दोडामार्ग येथे रवाना करण्यात आले. यामुळे प्रवाशी व स्थानिकांचे मात्र मनोरंजन झाले.