कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खांदेपालट, विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हाप्रमुखांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 18:39 IST2023-03-10T18:39:13+5:302023-03-10T18:39:39+5:30
पक्षसंघटना वाढविण्याची या नूतन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असणार

संग्रहीत छाया
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत आता तीन जिल्हाप्रमुख असणार आहेत. मुंबई येथील ‘मातोश्री’वर गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघासाठी संजय पडते, सावंतवाडी मतदार संघासाठी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी अतुल रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात पक्षसंघटना वाढविण्याची या नूतन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे.