वेंगुर्ल्यात भाजपच्यावतीने सरकारविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 02:56 PM2020-11-12T14:56:40+5:302020-11-12T14:58:03+5:30

Vengurle Police Station, sindhudurg, state transport, bjp, महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे सांगत या सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भाजपा वेंगुर्लाच्यावतीने एसटी आगाराच्या बाहेर मंगळवारी सरकारच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आले.

Anti-government agitation on behalf of BJP in Vengurla | वेंगुर्ल्यात भाजपच्यावतीने सरकारविरोधात आंदोलन

वेंगुर्ला येथील एसटी आगाराच्या बाहेर राज्यसरकारच्या विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत आंदोलन छेडले.

Next
ठळक मुद्देवेंगुर्ल्यात भाजपच्यावतीने सरकारविरोधात आंदोलनभाजपा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी

वेंगुर्ला : महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे सांगत या सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भाजपा वेंगुर्लाच्यावतीने एसटी आगाराच्या बाहेर मंगळवारी सरकारच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने जळगाव जिल्ह्यातील मनोज चौधरी व रत्नागिरी आगाराचे चालक पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केली. हे लोण पसरू नये यासाठी राज्य सरकारला वेळीच वठणीवर आणण्याची गरज आहे.

थकीत वेतनामुळे हजारो एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले असल्याचे सांगत हे आंदोलन छेडण्यात आले. वेंगुर्ला आगाराच्या बाहेर काळे झेंडे घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालाच पाहिजे, एसटी महामंडळ डबघाईस आणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ठाकरे सरकारचा निषेध असो
अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, एसटी कामगारांचे नेते प्रकाश रेगे, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, ज्येष्ठ नेते बाळा सावंत, मच्छिमार नेते वसंत तांडेल, तालुका चिटणीस जयंत मोंडकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, अमेय धुरी, निलय नाईक, श्रीकृष्ण हळदणकर, राहुल मोर्डेकर उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या पाठीशी

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे जायचे हा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या घरात ऐन दिवाळीत अंधार करणाऱ्या या अपयशी ठाकरे सरकारच्या विरोधात ऐन दिवाळीतच आंदोलनाचा जाळ काढण्याची वेळ जनतेवर आली असून भारतीय जनता पार्टी भक्कमपणे या सर्व अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहील, असे जिल्हा सरचिटणीस देसाई यांनी सांगितले.


 

Web Title: Anti-government agitation on behalf of BJP in Vengurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.