शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंना आणखी एक धक्का

By admin | Updated: September 24, 2014 00:09 IST

चंद्रकांत देशपांडे यांच्यासह अनेकजण शिवसेनेच्या वाटेवर

रत्नागिरी : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह शिवसेना सोडून काँग्रेसवासी झालेले चंद्रकांत देशपांडे यांच्यासह राजापूर तालुक्यातील अनेक राणेसमर्थकांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. हे सर्वजण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. कोकणचे नेते नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या समर्थकांनी एक-एक करून काँग्रेसला रामराम करण्यास सुरूवात केली आहे. माजी आमदार गणपत कदम आणि सुभाष बने यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवबंधन स्वीकारले आहे. आता त्यांच्या पाठोपाठ राजापूर तालुक्यातील आणखी काही राणेसमर्थक शिवसेनेच्या वाटेवर आहेत.१९९५ ते ९९ या काळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद सांभाळणारे प्रा. चंद्रकांत देशपांडे राणे यांच्यासमवेतच काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. काँग्रेसमध्ये जिल्हा प्रवक्ते म्हणून ते कार्यरत होते. ते आणि त्यांच्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.राणे यांच्याशी जवळीक असणाऱ्या दोन माजी आमदारांपाठोपाठ आता त्यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारीही एक-एक करून लांब होऊ लागले आहेत. हा राणे यांच्यासाठी धक्का ठरणार आहे.जिल्ह्यात राजापूर मतदार संघात काँग्रेसची ताकद आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेथेच मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. अर्थात हे जाणारे लोक कधी आमचे नव्हतेच, अशी भूमिका आता घेतली जात आहे. (प्रतिनिधी)...तेथे आमचे काय?नारायण राणे यांच्यासारख्या सक्षम नेत्याला जर काँग्रेसमध्ये त्रास होत असेल, तर आपल्यासारख्या सामान्य पदाधिकाऱ्यांना कोण विचारणार, अशा भावनेतून राणेसमर्थकांनी काँग्रेस सोडण्यास सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.